मुख्य सामग्रीवर वगळा

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दिलासा


पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही

तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार पाटील यांचा दिलासा जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना दिलासा  दिला.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नव्याने होत असलेल्या रेल्वेमार्गात तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दलीत वस्तीसह गावातील काही घरे बाधित होत आहेत. आमदार पाटील यांनी गावात जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी तसेच म्हणणे आस्थेवाईकपणे जाणून घेत त्यांना दिलासा दिला.

जागेचा वाढीव मावेजा मिळवून द्यावा, राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावरून ग्रामस्थांना दिलासा देत विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल यंत्रणेला निर्देश दिले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग पूर्ण करत असताना तडवळा गावातील कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. दलीत वस्तीमधील ज्या नागरिकांची घरे रेल्वेमार्गासाठी संपादीत केली जाणार आहेत, त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत कोणाचेही घर हलविले जाणार नसल्याची ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.

शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विनंतीवरून बाधित कुटुंबियांची भेट घेवून आमदार पाटील यांनी त्यांना दिलासा दिला. या नियोजित रेल्वेमार्गाच्या कामात गाव विस्थापित होणार, राहती घरे जाणार, या धास्तीने हवालदिल झालेल्या गावकर्यां ची आस्थेवाईकपणे विचारणा करून त्यांना मोठा विश्वास देत आमदार पाटील यांनी दिलासा दिला.

यावेळी तुळजापूरचे युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक नानासाहेब लोंढे, सरपंच ज्ञानेश्वर पांडगळे, उपसरपंच प्रवीण चंदनशिवे यांच्यासह तडवळा येथील रेल्वेबाधित कुटुंबीय, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...