मुख्य सामग्रीवर वगळा

महायुती सरकारमुळेच जिल्ह्यात अभूतपूर्व, ऐतिहासिक विकासपर्व …. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले सरकारचे धन्यवाद



धाराशिव:- जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविणार्याा अनेक महत्वपूर्ण योजना आणि प्रकल्पांना महायुती सरकारमुळे बळ मिळाले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत या अभूतपूर्व  व ऐतिहासिक विकासपर्वाची सुरुवात झाली आहे.
ठाकरे सरकार ने रखडवलेल्या महत्त्वाकांक्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा विकास, सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्ग, कौडगाव MIDC टेक्निकल टेक्स्टाइल पार्क, अशा अनेक कामांना महायुती सरकारने बळ आणि गती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुती सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारमुळे मागील अडीच वर्षांच्या कालावधीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे काम झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या जिल्हा दौर्याूच्या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी या सगळ्या कामांचे श्रेय महायुती सरकारला देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानले आहेत.

अनेक वर्षांपासून रखडलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा किचकट प्रश्न देखील महायुती सरकारने निकाली काढला व आवश्यक जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. भविष्यात येथे अद्यावत वैद्यकीय शिक्षण संकुल उभारले जाणार आहे. ज्यामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराचा अक्षरशः चेहरामोहरा बदलणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्याचा प्रश्नही निधी अभावी रखडला होता. त्याला महायुती सरकारनेच गती दिली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्याशी निगडीत असलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पाला ११,७०० कोटी रूपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिली. हजारो हेक्टर क्षेत्र या एका निर्णयामुळे ओलिताखाली येणार आहे. टंचाईग्रस्त असलेल्या धाराशिव जिल्ह्याचा कायापालट या एका निर्णयामुळे होणार आहे.
त्याचबरोबर कौडगाव एमआयडीसीत तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्प एमआयडीसीच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यामुळे 10 हजार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे.
तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र वैष्णोदेवीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळकपणे यावे आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकही तुळजाभवानीच्या नगरीत यावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या प्रशाद योजनेतून निधी मिळावा, यासाठी एकीकडे पाठपुरावा सुरू असतानाच महायुती सरकारने तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे तुळजापूर आणि परिसरातील अर्थकारणाला अभूतपूर्व अशी गती लाभणार असल्याचा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमात राज्यात धाराशिव जिल्हा अव्वल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरूणांच्या आणि माता भगिनींच्या हाताला महायुती सरकारमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
राज्यातील महायुती सरकारने आपल्या हिश्श्याचा 50 टक्के वाटा दिल्यामुळे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आले आहे. अशा अनेक प्रकल्प आणि योजनांना मागील अडीच वर्षांच्या काळात मिळालेले ऐतिहासिक बळ जिल्ह्याच्या अर्थकरणाला बळकटी देणारे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धराशिवकरांच्या वतीने मनस्वी आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...