मुख्य सामग्रीवर वगळा

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

  


भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

 भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत, आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर, सरपंच संतोष देशमुख हत्या, महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर सरकार काही करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक संतुलन नष्ट करण्यासाठी लोकांचे लक्ष हटवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत. या महाराष्ट्रात लोकांना भडकवण्याचा, महाराष्ट्राची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने करू नये, आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर जनता उत्तर मागत आहे. काल मोदीजी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे महाराजांच्या वेळी मणिपूर सारख्या घटना, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडल्या नाहीत हे अपमान आहे.

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...