मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन शंड आहे देशातील सर्वच्या सर्व कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका आतंकवाद्यांनी घेतल्या ताब्यात जनतेनी सर्व प्रकारचा महसूल शासनाला का द्यायचा ?

    भारत  सरकार  आणि महाराष्ट्र शासन शंड आहे     देशातील सर्वच्या सर्व कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका आतंकवाद्यांनी घेतल्या ताब्यात जनतेनी सर्व प्रकारचा महसूल शासनाला का द्यायचा ? कोषागार कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सर्व बँका झाल्या आर्थिक गुन्ह्याची केंद्रे झाली आहेत मात्र या कडे भारत सरकार आणि महाराष्ट शासन यांचे पूर्ण पणे दुर्लक्ष आहे आणि सदर पैसा आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तान ला जात आहे आणि आपला भारत देश लोकशाही मार्गाने गरीब होत आहे आणि पोटाची खळगी भरण्या साठी आपल्याच देशात राहणारे लोक आपल्या भारतास पैसे शत्रू राष्ट्राला पाठउन आपल्या भारतास गरीब करीत आहेत . भारताच्या प्रिय जनहो सबंध भारत वर्षातील प्रत्येक कोषागार कार्यालये आतंक वाद्यांनी आणि आतंकवादी प्रवृत्तीच्या लोकांनी ताब्यात घेऊन सबंध भारत वर्षातील सर्व जिल्ह्याचा महसूल टार्गेट व्यक्तीच्या संस्थाच्या नावे बँक म्यानेजर आणि लिपिक यांच्या मदतीने टार्गेट व्यक्तीच्या आणि संस्थाच्या नावे खाते चालउन सदर कोषागार आणि भारतीय स्टेट बँक मधील केंद्र व राज्य शासन अनुदानाचा पै...

द डिजिटल प्रेस - अद्ययावत दिनांक ४ फेबुर्वारी २०२५

                                                                              राष्ट्रीय सेवा योजना प्री आरडी शिबीर भोपाल मप सहभागी स्वयंसेवक साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त ,मंथली विजयप्रताप संपादक मालक मुद्रक प्रकाशक श्री आनंद मारुती लोखंडे एम एस सी प्राणीशास्त्र एम एड एम ए जनसंवाद आणि पत्रकारिता यांचे आनंद प्रिंटर्स आणि पब्लिशर्स द्वारा प्रकाशित द डिजिटल मिडिया   द डिजिटल   प्रेस   शासन संवाद समाज पुढारी    पत्ता सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी सोलापूर- ४१३२२४ मो ९९६०२०७४५३ Email prconsultantaml@gmail.com anandlokhande30@gmail.com अद्ययावत   दिनांक   ४  फेबुवारी   २०२५  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाराशिव नगरीत हार्दिक स्वागत -स्वगोतोच्सुक शिवसेना जिल्हा संघटक श्री सुधीर केशवराव पाटील

महायुती सरकारमुळेच जिल्ह्यात अभूतपूर्व, ऐतिहासिक विकासपर्व …. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले सरकारचे धन्यवाद

धाराशिव:-  जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविणार्याा अनेक महत्वपूर्ण योजना आणि प्रकल्पांना महायुती सरकारमुळे बळ मिळाले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. मागील अडीच वर्षाच्या कालावधीत या अभूतपूर्व  व ऐतिहासिक विकासपर्वाची सुरुवात झाली आहे. ठाकरे सरकार ने रखडवलेल्या महत्त्वाकांक्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा विकास, सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्ग, कौडगाव MIDC टेक्निकल टेक्स्टाइल पार्क, अशा अनेक कामांना महायुती सरकारने बळ आणि गती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुती सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार परंडा येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारमुळे मागील अडीच वर्षांच्या कालावधीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे काम झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यम...

निस्वार्थ प्रेमाचा अन् अखंड श्रमाचा झरा अन सोलापूरचे शिल्पकार म्हणजे सुशीलकुमार शिंदे - ॲड. मनीश गडदे पाटील सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मुंबई

आपल्या ५५वर्षांच्या नैतिक व प्रामाणिक सामाजिक जीवनात आणि राजकीय कारकीर्दीत भूषवलेली सर्व सन्मानांची पदे व संवैधानिक जबाबदारी पार पाडताना आपल्या जन्मभूमी सोलापूर करिता सतत विकासाचा हक्काचा वाटा पोचवण्याचं प्रामाणिक काम सोलापूरचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक केल्यानेंच सोलापूरचं नाव आज देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर ठळकपणे प्रतिबिंबीत होत आहे. दगडू संभू शिंदे उर्फ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे ,   गरीब घरातला एक सामान्य तरुण ते असामान्य व्यक्तिमत्त्व हा प्रवास कदाचित पुढील पिढ्यांमध्ये अविश्वसनीय वाटावा असाचं आहे. जीवनात एक माणूस आमदार ,  राज्यमंत्री ,  कॅबिनेट मंत्री ,  मुख्यमंत्री ,  राज्यपाल ,  खासदार ,  केंद्रीय मंत्री ,  देशाचा गृहमंत्री ,  संसदेचा नेता ही सर्व भारतीय लोकशाहीतील संविधानिक पदे आपल्या कर्तृत्वाने भूषवतो हि बाब स्वतंत्र भारतात अभिमानास्पद आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फोरम फॉर सोशलीस्ट  ॲ क्शनचे   राज्य   निमंत्रक ,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष ,...

बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा - हाजी मकबूल मोहोळकर

बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा असे   हाजी मकबूल   मोहोळकर यांनी आज भगिनी समाज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांच्या १२२३   व्या उर्स उत्सवानिमित्त पाच ते सात सप्टेंबर २०२४   रोजी पर्यंत संदल मिरवणूक चिराग महाप्रसाद इत्यादी धार्मिक सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जशने ईद-ए-मिलादुन्बी पैगंबर जयंतीनिमित्त दिनांक १६   सप्टेंबर   रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जजनी कमिटीच्या मुख्य मिरवणुकीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद योग दिनांक १६   सप्टेंबर २०२४   रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बारा   इमाम चौक सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल अजीम   नाजा टीव्ही स्टार यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार आहे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर बारा इमाम   चौकातील जागृत सोफी संत कुलदैवत हजरत प...

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि, १३:  मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री श्री. केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेवून शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली. वेरूळ येथील शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबत यावेळी शिष्टमंडळाने मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश दिले.शिष्टमंडळात किशोर चव्हाण, रवींद्र बनसोड, बाळराजे आवारे पाटील, प्रवीण नागरे, शशिकांत शिरसाट आदी...